गाव तेथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता अभियान युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांची संकल्पना
मुडखेड ता प्र
जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने प्रत्येक गावात गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता अभियान राबविण्याचा निर्धार करण्यात आला असून ग्रामीण भागातील जनसामान्य नागरिकापर्यंत शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जनसेवा उपक्रम राबविण्याचा संकल्प युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांनी केला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे जिल्ह्यातील दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळत पक्षाची मोट बांधण्याचा बांधली. जनतेने निवडणूक हातात घेत काँग्रेसचा बालेकिल्ला साबित राखत महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांच्या विजयावर मोहर लावला. पुन्हा आता जिल्ह्यात युवक काँग्रेसची मोठ बांधण्यासाठी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील गाढे यांच्या संकल्पनेतून गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता अभियान राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्रामीण भागातील जनसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी तसेच तालुकास्तरावरील छोट्या मोठ्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने लोकहित जनसेवा उपक्रम रबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या माध्यमातून मुदखेड, भोकर, अर्धापूर या तिन्ही तालुक्यात जनसेवेसाठी केंद्र उभारण्यात आले आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेंटीवार यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गावागावात थेट नागरिकांशी संवाद साधून काँग्रेसचे विचारधारा पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. युवक काँग्रेसने हाती घेतलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गावातील प्रमुख अडीअडचणी तत्परतेने सोडविल्या जात असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.