विद्यार्थ्यांसाठी युवक काँग्रेस रस्त्यावर
रि-नीट परीक्षा घेण्याची मागणी, केंद्र सरकारविरोधात आंदोलन
प्रतिकात्मक “मुन्नाभाई” लक्षवेधी
भोकरदन : नीट परीक्षेत मोठा घोळ झाला आहे. त्यानंतर प्रकरण न्यायालयात दाखल झाले. यात बराच वेळ जात असल्याने परीक्षार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. त्यामुळे युवक काँग्रेसने विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. शनिवारी २० जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी रि-नीट एक्झाम त्वरित घेण्याची मागणी करण्यात आली.
युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाच्यावतीने रि-नीट एक्झाम त्वरित घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांच्या नेतृत्त्वात आंदोलन पार पडले. परीक्षेत मोठा घोळ झाल्याची बाब उघडकीस आली आहे. परंतु, केंद्र सरकारच्यावतीने कोणतिही भूमिका घेतल्या जात नाही. शैक्षणिक नुकसान होईल, अशी भीती परिक्षार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने रि-नीट एक्झाम त्वरित घ्यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांनी केली.युवक काँग्रस च्या वतीने एक प्रतिकात्मक ‘मुन्नाभाई MBBS’ तयार करण्यात आला ज्यांनी मुन्नाभाई MBBS या गाण्यावर ठेका धरला.हा मुन्नाभाई ने सर्वांचे लक्ष वेढून घेतले.
आंदोलनात राष्ट्रीय युवक काँग्रेस चे नरसिंह यादव, राहुल देशमुख,इंद्रजीत देशमुख,महेश दसपुते,जुनेद शेख,रमेश जाधव,संतोष अन्नदाते,सोपान सपकाळ,कैलास सुरडकर,राजीव जाईभार,जावेद पठाण,ऋषिकेश शिंदे,अक्षय देशमुख,गौरव देशमुख,उमाजीराजे,प्रशांत जाधव,राहुल घायवात,दयानंद पगारे,विठ्ठल जाधव,शशिकांत देशमुख,शुभम राजपूत,बाळू बदार आदींची उपस्थिती होती.