जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जंयती उत्साहात
भोकरदन : तालुक्यातील तडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 104 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.तालुक्यातील तडेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक छोटे खाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते
त्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनातील किस्से भाषणातून सांगीतले.यावेळी तडेगाव येथील संरपच राजुसिग ब्हणावत, भिकाजी पाथरकर, नितीन साळवे, साहेबराव लोणकर, रत्नाकर साळवे, सामाजिक कार्यकर्ते व शालेय कमिटीचे अध्यक्ष फारूक शेख,उपाध्यक्ष गणेश देशमुख, पाडाळे सर, मतकर सरसह शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.यावेळी सर्व मान्यवरांचे शिक्षक मतकर सर यानी आभार मानले.