देऊळझरी येथील जिल्हा परिषद शाळा बनली डिजिटल
जाफ्राबाद प्रतिनिधी समाधान भोपळे
जाफ्राबाद : जिल्हा परिषदची शाळा म्हटले की नाक मुरडले जाते. मात्र,देऊळझरी येथील जिल्हा परिषद शाळा माञ ह्या गोष्टीला अपवाद आहे इथे विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवशीही या शाळेत यावेसे वाटते. ती जालना जिल्ह्यातील व जाफ्राबाद तालुक्यातील देऊळझरी या छोट्याश्या गावात शिक्षकांच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात आली आहे. खासगी शाळांच्या तोडीस ही शाळा बनवण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या या डिजिटल शाळेत स्मार्ट टीव्हीवर शिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यीही आनंदाने शिक्षण घेताना दिसतात.
देऊळझरी येथील जिल्हा परिषद शाळा या कात टाकत असल्याचं चित्र आहे. खासगी शाळा आणि सध्या भरमसाठ फी घेणाऱ्या इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येत घट होत आहे. शिवाय जिल्हा परिषदेचे शिक्षक आपल्या शाळेची गुणवत्ता टिकवण्यामध्ये ही अपयशी ठरत आहेत. मात्र जालना जिल्ह्यातील देऊळझरी या गावातील जिल्हा परिषद शाळा ही आदर्श जि.प शाळा म्हणून जिल्हाभरात नावारूपास येत आहे.
शाळा कौतुकाच विषय
देऊळझरी या गावातील जिल्हा परिषद शाळा खरच कौतुकाच विषय बनण्याचं कारण ही तसच आहे. आपण या शाळेच्या परिसरात प्रवेश केला तर आपल्याला वाटणार ही नाही की आपण डबघाईला आलेल्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करतोय. कारण प्रवेश करताच अरसीसी बांधकाम केलेलं प्रशस्त खोल्या व विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान. मैदानात घसरगुंडी, खो-खो, कबड्डीच मैदान, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुंदर असं बालकमंच तुमचं लक्ष वेधून घेत.
शालेय धडे हे विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे म्हणून
शाळेत प्रवेश करताच प्रांगणात पेव्हर ब्लॉक, भिंतीवर सुंदर अशे चित्र, प्रांगणात महागडे टाईल्स. भिंतीवर महापुरुषांचे कार्य, गणिताचे पाठ, मराठी-इंग्रजी महिने, इंग्रजी बाराखडी, भिंतीवर लिहलेले दिसते शालेय भिंतीवर महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे म्हणून गिरवले गेले आहेत. बाहेरून कुठून ही वाटत नाही की ही जिल्हा परिषद शाळा आहे. खासगी शाळेत भरमसाठ फी घेऊन ही इतक्या साऱ्या सुविधा दिल्या जात नाही तितक्या सरकारी शाळेत आहेत.
स्मार्ट टीव्हीवर शिक्षणाचे धडे
इतकच नव्हे तर वर्गात प्रवेश केला तर आपण कुठे आलो असाच भास होतो. त्याच कारण म्हणजे इथले शिक्षक बोर्डावर कमी आणि स्मार्ट टीव्हीवर जास्त शिकवतात. वर्गात ४३ इंची स्मार्ट एलईडी टीव्ही, सर्वांना आवाज जाईल असे स्पीकर, प्रयोगाचे साहित्य, काही बोर्ड आहेत ते विद्यार्थ्यांना सुचेल ते लिहायला. त्यांच्या कलेला आणि बुद्धीला वाव देण्यासाठी. ही चिमकुली स्मार्ट टीव्हीवर दिसणाऱ्या चित्रात रंगून जातात. शिवाय शिक्षक ही शिकवताना उत्साही दिसतात. अगदी नृत्य करून मुलांना कविता शिकवतात. मुलही त्यात रमून जातात.
शाळेला ‘iso ‘ मानांकन
फक्त डिजिटल करून हे शिक्षक थांबले नाहीत तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर ही भर देत आहेत. दरवर्षी या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र होत आहेत. शिवाय इतर अॅक्टिव्हिटीमध्ये ही मुलं चमकदार कामगिरी करत आहेत. म्हणून या शाळेला ‘iso मानांकन ही देण्यात आलं आहे. प्रत्येक जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षकांनी आणि जिल्हापरिषदेतील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला तर जिल्हापरिषद शाळांच रुपडं पालटल्या शिवाय राहणार नाही
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा आहेत. शिक्षण हे जीवनाचा पाया आहे आणि हे शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात प्राथमिक शाळा उभारल्या आहेत.पण त्या शाळांच अस्तित्व आज घडीला धोक्यात आल आहे पण देऊळझरी येथील जिल्हा परिषद शाळा तेला आपवाद आहे खाजगी शाळांना टक्कर देत आपल अस्तित्व आजही टिकून ठेवल आहे .तालुक्यातील बाकी शाळांनी असा आदर्श घेतल्यास एक दिवस नक्कीच मराठी शाळांचेच दिवस येतील
समाधान पाटील भोपळे
सामाजिक कार्यकर्ते