कास्ट्राईब महासंघ संलग्न अहमदनगर जिल्हा नगरपालिका व महानगरपालिका पेन्शनर असोसिएशनच्या वतीने महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी,अधिकारी यांची थकीत देयके व सहाव्या वेतन आयोगाची थकीत रकमा दिवाळी पूर्वी देण्याची मागणी करण्यात आली आहे.संघटनेच्या शिष्टमंडळाचे मनपाचे आयुक्त डॉ.पंकज जावळे व मुख्य लेखा अधिकारी धस यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले.
आयुक्त जावळे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पेन्शन व आठ महिन्याचा फरक देऊन दिवाळी गोड करण्याचे आश्वासन दिले.तर मुख्य लेखा अधिकारी धस यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा करुन ८ नोव्हेंबरपूर्वी कार्यवाही न झाल्यास महापालिके समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष पवळे यांनी दिला.महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी, अधि कारी यांची थकीत देयके अदा करण्यात आलेली नाही.ती दिवाळीपूर्वी मिळाल्यास त्यांची दिवाळी गोड होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.१ जुलै २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ अखेर एकूण आठ महिन्यां ची महागाई वाढ फरक रक्कम अंदाजे ५१ लाख रुपये,सहाव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम व सहाव्या वेतन आयोगा ची शक प्रमाणे थकबाकी रक्कम रुपये ७५ लाख रुपये देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.