Friday, March 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नागपूर : गृहपाठासाठी विद्यार्थीनीला अमानुष मारहाण

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 14, 2023
in crime
0
नागपूर : गृहपाठासाठी विद्यार्थीनीला अमानुष मारहाण
0
SHARES
47
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गृहपाठ केला नाही म्हणून दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थीनीला कानातून रक्त निघेपर्यंत मारल्याची दुर्दैवी घटना नागपुरातील सोमलवार शाळेत घडली आहे. याप्रकरणी पिडीत विद्यार्थीनीच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नागपुरातील रामदासपेठ परिसरातील सोमलवार इंग्रजी प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने शिक्षकांनी सांगितलेला गृहपाठ केला नव्हता. त्यामुळे संतापलेल्या शिक्षकाने सदर विद्यार्थीनीला इतक्या जोरात मारले की, तिच्या कानाला जखम होऊन त्यातून रक्त येऊ लागले. या घटनेनंतर शाळेतील एका शिक्षीकेने विद्यार्थीनीच्या आईला फोन करून याबात कळवले. तिची आई शाळेत पोहचली तेव्हा मुलगी खूप रडत होती. त्यानंतर मुलीच्या काकांनी तिला धीर देत प्रेमाने विचारणा केली असता पिराजी मायगु चाचेरकर (वय. 40 रा. गोकुळपेठ) या शिक्षकाने होमवर्क न केल्याच्या कारणावरून तिला अमानुष मारहाण केल्याचे धक्कादायक हकीकत समजली. यापूर्वी आरोपी शिक्षकाने इतर विद्यार्थीनींना देखील अशा प्रकारची मारहाण केल्याची माहिती पुढे आली. या घटनेनंतर पिडीत विद्यार्थीनीला तिचे पालक घरी घेऊन गेले. परंतु, घरी गेल्यावरही तिचा कान दुखत होता आणि ती ओक्साबोक्शी रडत होती. अखेर तिला दवाखान्यात नेण्यात आले असता इतक्या छोट्या मुलीला झालेली अमानुष मारहाण पाहून डॉक्टरांनी देखील आश्चर्य व्यक्त केले.

 

अखेर मुलीच्या आईने याप्रकरणी आरोपी शिक्षकाच्या विरोधात सीताबर्डी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी शिक्षक चाचेरकर याच्या विरोधात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी विद्यार्थीनीला मारहाण झाल्याचे मान्य केले. परंतु, पिडीतेच्या कानातून रक्त आल्याचा दावा फेटाळून लावला. तसेच काही कायदेशीर अडचणींमुळे आरोपी शिक्षकाला अटक करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षकावर कारवाई करणार- सोमलवार

यासंदर्भात शाळेचे संचालक प्रकाश सोमलवार यांनी सांगितले की, घडलेली घटना अतिशय गंभीर असून अशाप्रकारे विद्यार्थ्यांना मारहाण करणे आमच्या शिक्षण संस्थेची संस्कृती नाही. आरोपी शिक्षक जिल्हा परिषद शाळेतून अतिरिक्त (सरप्लस) झाल्याने 2 वर्षांपूर्वी आमच्या संस्थेत रुजू झालेत. या शिक्षकाच्या विरोधात यापूर्वीही काही तक्रारी आल्या होत्या. त्याची चौकशी सुरू असतानाच हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल अशी ग्वाही सोमलवार यांनी दिली.

Post Views: 149
Previous Post

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा सर्वांना हवा तोच निकाल लागो! – सचिन तेंडुलकर

Next Post

दिवा पूर्व -पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम वेगाने करणार – अभिजीत बांगर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
दिवा पूर्व -पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम वेगाने करणार – अभिजीत बांगर

दिवा पूर्व -पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम वेगाने करणार - अभिजीत बांगर

ताज्या बातम्या

स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त शहरात आनंदात , उत्साहात भक्तांनी मंदिरात दर्शन घेतले

March 20, 2026

वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पावसाने सोलापूरकर हैराण

March 20, 2026
घरगुती गॅस चा व्यावसायिक अवैध वापर; ४१ गॅस टाकी जप्त

घरगुती गॅस चा व्यावसायिक अवैध वापर; ४१ गॅस टाकी जप्त

March 20, 2026
गुणवंत विद्यार्थ्यांचा जय मल्हार सार्वजनिक वाचनालय यांच्यातर्फे विशेष सत्कार

गुणवंत विद्यार्थ्यांचा जय मल्हार सार्वजनिक वाचनालय यांच्यातर्फे विशेष सत्कार

March 20, 2026
एक एप्रिल पासून मल्लिकार्जुन यात्रेस सुरुवात

एक एप्रिल पासून मल्लिकार्जुन यात्रेस सुरुवात

March 20, 2026
शहर व परिसरात गुढीपाडवा उत्साहात; कावडी उत्सवाची सुरवात

शहर व परिसरात गुढीपाडवा उत्साहात; कावडी उत्सवाची सुरवात

March 20, 2026
जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तर्फे महिला दिन साजरा

जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तर्फे महिला दिन साजरा

March 20, 2026
सोलापूरच्या मातीतील सुपुत्राची गरुडझेप: ‘भाजी विक्रेत्याचा मुलगा’ जिल्हा पोलीस अधीक्षक!

सोलापूरच्या मातीतील सुपुत्राची गरुडझेप: ‘भाजी विक्रेत्याचा मुलगा’ जिल्हा पोलीस अधीक्षक!

March 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0752002

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697