माता, शिशू व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. परंतु, गर्भवती मातांकडून स्वतः बरोबरच बाळाची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. त्यामुळे शिशू व बालमृत्यूचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही. सोलापूर जिल्ह्यात मागील सहा महिन्यात २४५ शिशू (एक वर्षाखालील) व २७८ बालमृत्यू (५ वर्षांखालील) झाले आहेत. त्यात बार्शी, माढा, मोहोळ व पंढरपूर या तालुक्यात सर्वाधिक प्रमाण आहे.राज्यातील बालविवाहाचे प्रमाण अजूनही कमी झाले नसून, टॉप-५ जिल्ह्यांच्या यादीत सोलापूर देखील आहे. अनेकदा मुलीची शारीरिक वाढ पूर्ण झालेली नसतानाही तिच्या इच्छेविरुद्ध विवाह लावून दिला जातो. त्याच मुलींना पुढे गर्भासंदर्भातील गंभीर आजारांना तथा समस्यांना तोंड द्यावे लागते. दुसरीकडे अद्याप ग्रामीण भागात आरोग्याच्या पूर्णपणे सुविधा मिळत नाहीत. रुग्णालयात वेळेत पोचण्यातील अडचणी दूर झालेल्या नाहीत.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
















