अंबाजोगाई (त भा वृत्तसेवा) – तालुक्यातील चनई ते आडस फाटा दरम्यान आज सकाळी बारा वाजताच्या सुमारास सदर अपघात झाला असून त्यात दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील चनई ते आडस फाटा दरम्यान आज सकाळी बारा वाजताच्या सुमारास सदर कार झाडाला धडकल्याने हा अपघात झाला. या घटनेत डॉक्टर प्रमोद राजाभाऊ बुरांडे (वय 39) जागीच ठार झाले असून, त्यांचे सहकारी डॉक्टर रवी संतोष सातपुते (वय 38) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान डॉक्टर प्रमोद बुरांडे आणि डॉक्टर रवी सातपुते हे दोघेही निष्णात फिजिओथेरपीस्ट होते. आडस येथील एका आरोग्य शिबिराला भेट देऊन ते कारमधून (एम एच 44 एस 39 83) अंबाजोगाई कडे निघाले होते. आडस ते चनई रोडवर उतारावर त्यांचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला झाडाला धडकली. या अपघातात या दोन्हीही उमद्या डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने अंबाजोगाई शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.