अक्कलकोट एसटी बस स्थानकामागील एसटी महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमण आज हटविण्यात आले. पोलिस बंदोबस्तामध्ये एसटी महामंडळ, जागा मोजणी कार्यालय व अक्कलकोट तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई झाली. अतिक्रमणधारकांनीही सहकार्याची भूमिका घेतल्यामुळे संघर्ष टळला अन् बसस्थानक परिसर अतिक्रमणमुक्त झाला.
अक्कलकोट एसटी बसस्थानकामागील एसटीच्या मालकीच्या असलेल्या जागेवर काही जणांनी अतिक्रमण करून छोटी- छोटी दुकाने व पत्र्याचे शेड मारलेले होते. एसटी महामंडळाचे आगारप्रमुख एम. बी. जुनेदी, अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट व मोजणी कार्यालयाचे बिराजदार यांनी मोजणी करून एसटी महामंडळाच्या जागेची हद्द निश्चित केली.