सध्या महाराष्ट्रातील ज्वलंत असलेला विषय म्हणजे मराठा आरक्षण. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. यावर सरकार काय निर्णय घेतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. यात अभिनेत्री अश्विनी महांगडे, रितेश देशमुख, किरण माने यांनी पोस्ट आणि ट्वीट करत मराठा समाजाला समर्थन दिलं आहे. अनेक कलाकार याबद्दल बोलताना दिसत आहेत. मात्र नुकतंच मराठा आंदोलनाला हिंसक वळण आलं होतं. त्यावर आता अभिनेत्री केतकी चितळे हिने एक पोस्ट करत वेगळाच प्रश्न उपस्थित केला आहे. केतकीने एक एसटी फोडतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
एस टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा??! इंडियाला Uniform Civil Code (UCC) हवा असेल, पण भारताला UniformCivilLaw, तसेच UniformCriminalLaw ची गरज आहे.सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? आणि एस टी विभाग किंवा चालक कसे देणार आरक्षण. चुकुन तो दगड चालकाला लागला असता तर? ।।जय हिंद।। …।।वंदेमातरम्।। …भारत माता की जय’,असं म्हणत केतकीने तिची नाराजी सोशल मीडियावर जाहीर केली. पण यामुळे केतकी प्रचंड प्रमाणावर ट्रोल झाली आहे. केतकीच्या या विचारांचा सगळ्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या मुद्द्यावर तिने न बोललेलंच बरं असे म्हणत अनेकांनी तिला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.
काहींना तिचा मुद्दा पटला आहे तर काहींनी तिला विरोध केला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.