या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. 16 डिसेंबर 2022 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.
जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित ‘अवतार 2’ हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. आता या सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या सिनेमाची जादू सिनेमागृहात अनुभवल्यानंतर पुन्हा एकदा घरबसल्या अनुभवण्याची चाहत्यांची इच्छा आहे. त्यामुळे आता हा निर्माते हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा विचार करत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ हा सिनेमा Disney + Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो. सिनेमागृहात 45 दिवस पूर्ण केल्यानंतर सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येतो. पण अद्याप ‘अवतार 2’च्या निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.