गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक सरकारी रुग्णालयाची व्यवस्था कोलमाडली असून,सरकारच्या हलगर्जीपणामुळे अनेक रुग्णांना प्राणांना मुकावे लागत आहेत.याला सर्वस्वी जबाब दार सरकारची अना स्था आहे.हे सरकार फक्त घोषणा करत आहे.तसेच तोडफोडीच्या राजकारणात गुंतलेले असल्याने नागरिकांच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे राहिलेले नाही.अनेक जिल्हातील सरकारी रुग्णालयात पुरेसा औषधांचा साठा नाही,डॉक्टर्स,स्टाफची कमतरता असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांचे जीव जात आहेत.याच पार्श्वभुमीवर आज आम्ही अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेची पाहणी केली असता अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.त्याचा आम्ही निषेध करतो.येथे पाहणी केली असता जिल्हा रुग्णालयच ऑक्सिजनवर आहे. त्यामुळे तातडीने येथील परिस्थितीची दखल घेत शासनाने रुग्णालयाच्या कारभारात सुधार णा करावी,अन्य था तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल,असा इशारा शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिला.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा रुग्णालय येथे पाहणी करुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांच्याशी चर्चा करण्यात आली.
यावेळी पदाधिकार्यांनी रुग्णालयातील विविध मशिनरी सुरु आहेत की नाही, औषधांचा साठा पुरेसा आहे की नाही,ऑक्सिजनची परिस्थितीची,बाल रुग्णालया तील कक्षाची माहिती घेतली.यावेळी स्वच्छतेविषयी या शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली.यावेळी निदर्शने करुन आरोग्य मंत्र्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी झालेल्या चर्चेत पेशंटच्या प्रमाणात खाटांची संख्या कमी आहे. स्टाफची कमतरता आहेत.नवीन ५०० बेडचा प्रस्ताव व स्टाफची संख्या वाढविण्याबाबत शासनास अहवाल पाठविला असल्याचे सांगितले.