नांदेड- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टीका करणाऱ्या पाकिस्तानच्या बिलावल भुट्टो यांचा नांदेडमध्ये भाजपकडून पुतळा जाळण्यात आला. यावेळी पुतळा जाळताना आगीचा भडका उडाल्याने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा हात थोडासा भाजल्या गेला..नांदेडमध्ये आज भाजप कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने एकत्र येत पाकिस्तानचा निषेध केला. त्यावेळी पुतळा जाळताना ही घटना घडली. पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यासाठी स्वतः खासदारांनी आग लावली.
त्यावेळी आगीचा भडका उडाल्याने ही घटना घडली. उपस्थित कार्यकर्त्यानी प्रसंगावधान राखत आगीचा भडका तातडीने विझवला. या घटनेत खासदार प्रताप चिखलीकर यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. आगीच्या या भडक्यात हाथाची तीन ते चार बोट भाजली आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...