नांदेड : वाढत्या महागाईमुळे आधीच कंबरडे मोडले असताना आता भाज्यांचे दर तर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट हाताबाहेर जात आहे. पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. टोमॅटोच्या दराने मात्र कहर केला असून दराने शंभरी पार केली आहे. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशातील ८३० किलो मीटर अंतरावरील मदनपट्टी येथून नांदेडमध्ये लालबुंद टोमॅटो विक्रीसाठी आले आहेत.
ग्राहकांनाही या टोमॅटोची भुरळ पडली असून खरेदीसाठी गर्दी करत आहेत. महाराष्ट्रातून टोमॅटोचा पुरवठा देशभरात केला जातो. व्यापाऱ्यांच्या मते, बाजारात टोमॅटोचा तुटवडा आहे. टोमॅटोची आवक घटली आहे. तसेच बाजारपेठेत माल कमी येत आहे. मागणी जास्त असून आवक कमी आहे. त्यामुळे घाऊक बाजारात १०० रुपये किलो तर, किरकोळ बाजारात १२० रुपये किलो दराने विकले जात आहेत. आणखी एक महिना ही स्थिती राहील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
इतर भाज्यांचे दरघाऊक बाजारात टोमॅटो- १०० ते १२० रुपये,
आले – २०० ते २४० रुपये
लसून -१२० ते १६० रुपये
मिरची – १२० ते १५० रुपये
कोथींबीर – १५० रुपये
भेंडी – ४० ते ५० रुपये
मेथी – २५ रुपये (जुडी)
काकडी ३० ते ५० रुपये,
फुलकोबी – ६० ते ८० रुपये,
गवार, शेवगा, चवळी – ६० ते ८० रुपये किलो
लोणच्याचा आंबा ६० ते १०० रुपये किलो