या मजुरांच्या सुटकेचे प्रयत्न शुक्रवारी दुपारी 2 वाजेपासून बंद होते. त्यानंतर सिल्क्यरा येथून रविवारी दुपारी 4 वाजता ड्रिलिंगचे काम पुन्हा सुरू झाले. टनलमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी येथून आतमध्ये अन्न पाठवण्यासाठी आणखी एक छोटा पाइप ड्रिल करण्यात आला आहे. या दुर्घटनेला 9 दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही मजुरांची सुटका झालेली नाही. जसेजसे दिवस लोटत आहेत तसतसे मजुरांचे मनोधैर्य खचत आहे. या मजुरांच्या नातेवाईकांनी रविवारी घटनास्थळी जाऊन रोष व्यक्त केला. तसेच मजुरांच्या सुटकेसाठी जलद प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी केली.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















