तुमच्या बँक खात्यात अचानक कोट्यवधी रुपये आले तर… साहजिकच कुणालाही आनंद होईल. नांदेडमधील एका पेट्रोलपंप चालकाच्या खात्यातही असे अचानक कोट्यवधी रुपये आले.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी येथील पेट्रोलपंप चालक साईप्रसाद पाटील एका रात्रीत करोडपती झाला.31 मार्च रोजी त्यांच्या बँक खात्यात तब्बल दीड कोडी रुपये जमा झाले.त्यांना मोबाईलवरही तसा मेसेज आला.साईप्रसाद यांना आपल्या व्यवहाराचे 15 लाख रुपये जमा झाले, असं वाटलं. त्यांनी मेसेजही नीट पाहिला नव्हता.
पण त्यानंतर त्यांना एक फोन आला. ज्यावर त्यांच्या खात्यात चुकून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर झाल्याचं सांगण्यात आलं.सोलापूरच्या एका खासगी कंपनीच्या खात्यातून चुकून साईप्रसाद यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले. चूक लक्षात आल्यानंतर कंपनीने साईप्रसाद यांच्याशी संपर्क केला.त्यानंतर दुसऱ्याच दिवशी साईप्रसाद पाटील यांनी ही रक्कम कंपनीकडे परत पाठवली.