औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते, श्री. विजय हुलसुरकर यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते 65 वर्षांचे होते. अतिशय मनमिळाऊ स्वभाव व दांडगा जनसंपर्क यामुळे औरंगाबाद च्या उद्योग विश्वात ते अतिशय लोकप्रिय होते. सामाजिक कार्यात ही ते हिरीहिरीने सक्रिय होते. त्यांच्या निधनाने औरंगाबाद येथील उद्योग क्षेत्रात शोक कळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, सून,नातू असा परिवार आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















