नगदी पीक म्हणून मोठ्या अपेक्षेने लागवड केलेला कांदा कवडीमोल भावाने विकू लागल्याने सततच्या ढासळत्या दराने उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांत नैराश्याचे वातावरण पसरले आहे.
तुळजापूर तालुका हा कुसळी तालुका म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध हवा पाण्याविना फक्त तुळजाभवानीमुळेच तालुक्याची ओळख निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील सोयाबीन , उडीद , मूगही अवेळी व कमी जास्त पडलेल्या पावसामुळे उतारावर व मालाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन तोही हंगाम वाया गेला होता रब्बी हंगामातील जेमतेम पाण्यावर कसा बसा जगवलेला कांदा कवडीमोल दराने विकू लागल्याने नगदी पिकच हातचे गेल्याने जगावे कसे असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांत निर्माण झाला आहे.]
मागील काही वर्षांपासून सर्वच पिकांचा उत्पादन खर्च जास्त व उत्पन्न कमी यामुळे शेती करावी की नाही अशीही चर्चा शेतकरी वर्गातून केली जात आहे सतत शेतकरी निसर्गाच्या आस्मानी व व्यापाऱ्यांच्या सुलतानी संकटात सापडून भरडला जात आहे शासनाने चालू महागाई काळातील दरांचा अभ्यास करून प्रत्येक पिकाचे हमीभाव निर्धारित करावे व या हमीभावाची काटेकोर अंमलबजावणी करावी तरच शेती टिकेल व युवक शेतीकडे वळतील अशी जोरदार चर्चा ग्रामीण भागात ऐकावयास मिळत आहे




















