कोल्हापूर येथील शिवाजी पार्क भागातून आगीचं वृत्त हाती आलं आहे. कोल्हापूरच्या शिवाजी पार्क येथील झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत वीस घरांना आग लागली आहे. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी पोचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील शिवाजी पार्क येथील झोपडपट्टीला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत परिसरातील २० घरे जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे अनेक कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान खबर मिळाल्याने घटनास्थळी पोचले. त्यानंतर अथक परिश्रमानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
कोल्हापूरच्या शिवाजी पार्कातील झोपडपट्टीत आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यामुळे झोपड्यांना लागलेली आग विझविण्यासाठी नागरिकांची एकच धावाधाव झाली. अग्नीशमन दलाच्या जवानासहित नागिरकांनी देखील आग विझविण्यासाठी मदत केली.
या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाी सिलेंडरचा स्फोट झाल्याचा आवाज ऐकला, त्यानंतर भीषण आग लागली असं नागरिक सांगत आहे. या आगीत तांब्यापासून बनवणाऱ्या साधनसामुग्री वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भीषण आगीत झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहेत.