भारतीय फिरकी गोलंदाजीतील चमकणारा एक अद्वितीय तारा आज निखळला. भारतीय फिरकीला ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून दिला असे बिशनसिंग बेदी यांचे ७७ व्या वर्षी निधन झाले. भारतीय संघाकडून १९६६ ते १९७७ या कालावधीत त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती. बेदी-प्रसन्ना ही भारताची फिरकी जोडी चांगलीच प्रसिद्ध होती. पण त्यामधील आता बेदी यांनी आज या जगाचा निरोप घेतला.
भारताचे फिरकी हे प्रमुख अस्त्र आहे हे जगाला दाखवून दिले ते बेदी यांनी. बेदी यांनी प्रसन्ना आणि चंद्रशेखर यांच्या साथीने जगाला आपल्या फिरकीच्या तालावर चांगलेच नाचवले होते. भारतीय संघ जेव्हा १९७८ साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा त्यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. आपल्या डावखुऱ्या फिरकीच्या जोरावर त्यांनी फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले होते. डावखुऱ्या गोलंदाजीची फिरकी गोलंदाजी कशी असावी, याचा उत्तम वस्तुपाठ हा बेदी यांनी दाखवून दिला होता. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा दबदबा होता.
बेदी यांनी भारताकडून ६७ कसोटी सामने खेळले होते. या २६६ कसोटी सामन्यांमध्ये बेदी यांनी २६६ बळी मिळवले होते. त्याचबरोबर बेदी हे १० वनडे सामनेही खेळले होते. या १० वनडे सामन्यांमध्ये बेदी यांनी सात बळी मिळवले होते. १९७६ मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे मालिकेतील तिसऱ्या कसोटीत बलाढ्य वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी विजय मिळवून महान मन्सूर अली खान पतौडी यांनी आपेल नेतृत्व सिद्ध केले होते. पण पतौडी यांच्यानंतर बेदी यांच्याकडे भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली होती. भारताचे कर्णधार म्हणून त्यांनी आपली जबाबदारी चोख बजावली होती.
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूरबेदी यांच्या निधवानंतर म्हटले आहे की, ” भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी राहिले नाहीत. हे क्रिकेटचे मोठे नुकसान आहे,” बेदी, बीएस चंद्रशेखर, एस. वेंकटराघवन आणि एरापल्ली प्रसन्ना हे भारताच्या फिरकी गोलंदाजीच्या इतिहासातील क्रांतीचे अभियंते मानले जातात. त्यामधील बेदी यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूने आज जगाचा निरोप घेतला आहे.