60 आणि 70 च्या दशकातील प्रसिद्ध गायिका शारदा राजन अय्यंगार यांनी आज 14 जून रोजी या जगाचा निरोप घेतला. शारदा या ८६ वर्षांच्या होत्या.
शारदा यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९३७ रोजी तामिळनाडूतील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. शारदा राजन अय्यंगार ‘तितली उडी’ या गाण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत.
शारदा यांना 1970 मध्ये आलेल्या ‘जहां प्यार मिले’ या चित्रपटात ‘बात जरा है आप की’ हा कॅबरे गाण्यासाठी महिला पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.