मालिका विश्वातील मानाचा आणि झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अवॉर्ड’. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. प्रेक्षक पसंतीच्या ह्या अवॉर्ड सोहळ्यासाठी मतदान सुरु झालंय. कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल ह्याची निवड तुम्ही म्हणजेच मायबाप प्रेक्षक करणार आहात. यंदा ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘सारं काही तिच्यासाठी’, ‘तू चाल पुढं’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘३६ गुणी जोडी’ या मालिकांमध्ये आणि कलाकारांमध्ये चुरस रंगणार आहे. तर काथाबाह्य कार्यक्रमाच्या शर्यतीत ‘चला हवा येऊ द्या’, ‘होम मिनिस्टर’, ‘वेध भविष्याचा’ आणि ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ हे कार्यक्रम असणार आहेत.
हे मतदान तुम्ही १८ ऑक्टोबर पर्यंत झी मराठीच्या ऑफिशिअल फेसबुक (http:it.ly/ZMA2023) पेज वरून किंवा Zee5 वरून सुद्धा करू शकता.
तेव्हा आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा. कारण हे आपल्या घरचं कार्य आहे.