आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना नुकताच पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.या सामन्यात शेवटच्या चेंडूवर रवींद्र जडेजाने चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यासह चेन्नई सुपर किंग्ज संघाने पाचव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. दरम्यान या विजयानंतर आयपीएलच्या ट्रॉफीची तिरुपती चरणी पुजा करण्यात आली आहे.
तिरुपती चरणी आयपीएलची ट्रॉफी..
चेन्नई सुपर किंग्ज संघाने जोरदार कामगिरी करत पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. ही ट्रॉफी जिंकल्यानंतर चेन्नईचा संघ अहमदाबादमधून चेन्नईला रवाना झाला. चेन्नई एअरपोर्टवरून ही ट्रॉफी थेट चेन्नईतील प्रतिष्ठीत तिरुपती मंदिरात नेण्यात आली.
यावेळी चेन्नई सुपर किंग्ज संघातील एकही खेळाडू उपस्थित नव्हता. या ट्रॉफीचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या पूजेसाठी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी देखील हजेरी लावली होती.
Special pooja for the new trophy!!🏆#CSK management visits Tirupati temple at T. Nagar, Chennai for a special pooja of their newest IPL trophy. 🙏
Heartburn moment for Dravidians! 😭#IPLFinal2023 #IPL2023Finals #CSKForever pic.twitter.com/JfMgj55Ns7
— NK (Modi ka Parivar) 🇮🇳 (@nirmal_indian) May 30, 2023