तुळजापूर – माघ शु.प.१२ शके १९४४ भीष्मव्दादशी गुरुवार दि.२ रोजी श्री तुळजाभवानी देवीजीच्या सिंहासनावर मगर सांगवी ( काटी) ता. तुळजापूर येथील शेतकरी श्री. विशाल बापु मगर यांनी आपल्या शेतातील तीन ऐकर द्राक्ष बागेतील आलेल्या पहिला द्राक्षाचा पाच कँरैट माल देविचरणी अर्पण केला .यातील द्राक्ष चा आरास देविजींच्या सिंहासनावर करण्यात आला व शिल्लक द्राक्ष माल भाविकांना प्रसाद म्हणून वाटप केला.
द्राक्षबागेतील पहिल्या माल देविचरणी मी द्राक्ष बाग यंदा पहिल्यांदा लावली असुन द्राक्ष बागेतील आलेला द्राक्षाचे घड देवीचरणी अर्पण केला असुन आता हा माल विकण्यास आम्हीआरंभ करणार असल्याची माहीती द्राक्षबागायतदार विशाल मगर यांनी दिली