केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज, बुधवारी झालेल्या बैठकीत पीएम ई-बस सेवेला मंजुरी देण्यात आलीय. त्यानुसार भारतातील 100 शहरांमध्ये आता इलेक्ट्रिक बस चालवली जाणार आहे. देशभरात 10 हजार नवीन इलेक्ट्रिक बसेस चालवण्यासाठी 57 हजार 613 कोटी रूपये मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
अनुराग ठाकूर म्हणाले की, केंत्रिय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीएम ई-बस सेवेला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 57 हजार 613 कोटी रूपये मंजूर करण्यात आहेत. देशभरात सुमारे 10 हजार नवीन इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इलेक्ट्रिक बस सेवा 2037 पर्यंत चालणार आहे. बस रॅपिड ट्रांझिट प्रोजेक्ट तयार केला जाईल. भारतातील 100 शहरांमध्ये सेवा सुरू होईल. सार्वजनिक वाहतूक सेवेच्या विस्ताराअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे.