दोन लाख रूपये लाचेची मागणी केल्याने बार्शीतील शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सांगितले. सचिन प्रकाश उकिरडे (लोकसेवा विद्यालय, आगळगांव, ता. बार्शी) असे लाचेची मागणी करणारा शिक्षक आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, सचिन उकिरडे याने विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे यांच्याशी तक्रारदार यांचे शिक्षक संघटनेशी संबंधित दोन शिक्षकांचे शालार्थ आयडीच्या अनुषंगाने बोलणे झाले. औदुंबर उकिरडे यांच्याकरिता म्हणून तक्रारदार यांचे शिक्षक संघटनेतील एका शिक्षकांचे शालार्थ आयडीचे केलेल्या कामाचा मोबदला व एका शिक्षकाचे शालार्थ आयडीचे काम करण्यासाठी म्हणून प्रत्येकी एक लाख रूपये असे दोन लाख रूपये लाचेची मागणी केली.