स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे मार्गदर्शनाखाली मालाविषयी गुन्हयाची उकल करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथक टेंभूर्णी शहरात हजर असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, मौजे कव्हे कुर्डूवाडी ता. माढा जि. सोलापूर येथील इसम हे चोरलेल्या मोटार सायकली विकण्याकरीता मौजे शेटफळ ता. मोहोळ येथील हाॅटेल नयन येथे येणार असल्याबाबत खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोलीस इन्स्पेक्टर शैलेश खेडकर व त्यांचे पथक हे टेंभूर्णी येथून निघून बातमी प्रमाणे शेटफळ येथील हाॅटेल नयन समोर येवून सापळा लावले असता काही वेळाने बातमीप्रमाणे 02 इसम विनानंबर प्लेटच्या मोटार सायकलसह सदर ठिकाणी आल्याचे दिसले, बातमी प्रमाणे त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे कब्जात मिळून आलेले मोटार सायकलचे कागदपत्रा बाबत चैकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागले. त्यांचेकडे कौशल्यपुर्ण विचारपूस करून तपास करता त्यांनी सांगितले की, आज सुमारे 10 दिवसापूर्वी 01 मोटार सायकल ही कुर्डूवाडी येथील बारलोणी येथून रात्रीच्या वेळी एका घरासमोरून चोरी केली असलेबाबत सांगितले सोलापूर ग्रामीण जिल्हयातील एकूण 07 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्याची माहिती खालील प्रमाणे आहे. इतर 5 मोटार सायकलीबाबत संबंधीत मोटार सायकल मालकांशी संपर्क करून माहिती घेण्याचे काम चालू आहे. तरी सदर आरोपीतांकडून 12 मोटार सायकलीसह एकूण 05 लाख 40 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















