तेर येथील शिवाजी खटिंग यांच्या शेतात लोकवाट्यातून बांधण्यात आलेल्या कालेश्वर जटाशंकर मंदिरात बुधवार दिनांक 29 मार्च रोजी कलश रोहन सोहळा उत्साहात संपन्न झाला. विविध धार्मिक कार्यक्रमाने गावातून कलश मिरवणूक काढून हिंगळजवाडी दत्त मंदिराचे महंत ब्रह्मचारी किशन गिरी महाराज यांच्या शुभहस्ते कलशारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ह.भ.प. गोविंद महाराज पांगरकर यांचे काल्याचे कीर्तन झाले . महाप्रसादाचे वाटप करून कलशा रोहन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी मंदिराचे मुख्य पुजारी सचिन महाराज खटिंग, बालाजी सुतार, बाळू भक्ते, इंद्रजित ढोबळे, बबलू काळे, तेरच्या माहेरवाशीण महिला भाविक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















