केंद्र सरकारने 14 औषधांवर बंदी घातली आहे. डीजीसीआय म्हणजेच भारतीय औषध नियामक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी, 3 जून रोजी हा निर्णय घेतला आहे.
भारताकडून 14 औषधांवर बंदी
भारत सरकारने 14 प्रकारच्या फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी (Ban) घातली आहे. या औषधांचा संबंधित रोगांवर होणारा परिणाम आणि उपचारात्मकतेबाबत स्पष्टता आढळून आल्याने डीसीजीआयने या औषधांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलत 14 प्रकारच्या FDC कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घातली आहे.
फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषध म्हणजे काय?
दोन किंवा अधिक घटक एकाच औषधात एकत्र मिसळलेले असणे म्हणजे फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन होय. यामध्ये Nimesulide + Paracetamol dispersible गोळ्या आणि Pholcodine + Promethazine या सारख्या घटकांचा समावेश आहे.
डीजीसीआयच्या मागणीनंतर केंद्राचं मोठं पाऊल
या औषधांच्या उपचाराबाबत कंपनीला स्पष्टीकरण नसल्याने या औषधांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच या औषधांमुळे आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे डीसीजीआयच्या तज्ज्ञ समितीला आढळून आल्याने ही बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.