Friday, March 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

धोरणात्मक निर्णयांची विहित कालमर्यादेत अंमलबजावणी करावी – डॉ. तानाजी सावंत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 5, 2023
in health
0
धोरणात्मक निर्णयांची विहित कालमर्यादेत अंमलबजावणी करावी – डॉ. तानाजी सावंत
0
SHARES
80
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आरोग्य विभागाच्या रूग्णालयांमधून मोफत उपचार, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या खर्चाची मर्यादा 5 लाख रूपये व केवळ अधिवास पात्रता ग्राह्य धरणे यांसारख्या महत्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. असे धोरणात्मक निर्णय व यापूर्वी सूचीत केलेल्या धोरणात्मक बाबींची अंमलबजावणी विहित कालमर्यादेत करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.

आरोग्य भवन येथील सभागृहात आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत आरोग्य मंत्री डॉ. सावंत बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, संचालक (वित्त) जयगोपाल मेनन, अतिरिक्त संचालक नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक (मानसिक आरोग्य) डॉ. स्वप्नील लाळे, सहसचिव अशोक आत्राम, सहसंचालक विजय कंदेवाड, विजय बाविस्कर, सुभाष बोरकर आदी उपस्थित होते.

राज्यात 700 ठिकाणी आपला दवाखाना सुरू करावयाचा असून पुढील 15 दिवसांत उर्वरित दवाखाने सुरू करण्याच्या सूचना देत आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, महानगरपालिका क्षेत्रात उद्दिष्टाप्रमाणे आपला दवाखाना सुरू करावा. लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याकरीता जनजागृती करावी. राज्यात 1 मे पासून आतापर्यंत योजनेचा 8 लाख 26 हजार पेक्षा जास्त लोकांनी लाभ घेतला आहे. लोकसंख्येनुसार आपला दवाखान्यांची संख्या वाढली, तरी चालेल त्यासाठी आर्थिक तरतुदही वाढविण्यात यावी. महानगरपालिका क्षेत्रात असणारे अन्य शासकीय रुग्णालये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणून मान्यता घेण्यात येईल. आपला दवाखाना व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशिष्ट यंत्रणा उभारण्यात यावी. यामध्ये सातत्य असावे.

राज्यात ‘निरोगी आयुष्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे’ ही 18 वर्षावरील पुरुषांची आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत 18 वर्षावरील सर्वांची आरोग्य तपासणी करावी. या मोहिमेची अंमलबजावणी विशिष्ट कालमर्यादेत असावी. मोहिमेचा दैनंदिन स्वरूपातील विभागनिहाय ‘रेकॉर्ड’ ठेवावा. अभियानाचे नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकारी नियुक्त करावा. तपासणीमध्ये दुर्धर आजार किंवा शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रूग्णांना जवळच्या रूग्णालयात संदर्भित करावे. तपासणी करताना विहित नमुन्यात माहिती सादर करावी. मोहिमेत जलद गतीने तपासणी होण्यासाठी नागरी भागात सूचीबद्ध रूग्णालये, खासगी रुग्णालयांचे सहकार्य घ्यावे. घरोघरी जाऊन पुरुषांची आरोग्य तपासणी करावी.

 

जनआरोग्य योजनेचे दीड लाख रूपयांवरून पाच लाख रुपये खर्चाची मर्यादा सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये गतीने राबवावी. धर्मदाय रूग्णालयांसाठी ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपचे पुन्हा प्रात्याक्षिक करून घ्यावे. ॲपविषयी जनजागृती करावी. धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरोग्यदूतांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचनाही आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या.

राज्यातील आरोग्य विषयक चाचणी प्रयोगशाळांवर विभागाचे नियंत्रण असावे. त्यासाठी कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव सादर करावा. विविध औषधांच्या खरेदीसाठी औषध खरेदी प्राधिकरण निर्माण करण्यात आले आहे. प्राधिकरणाची बैठकही घेण्यात आली असून प्राधिकरणात रिक्त जागांवर प्राधिकारी नेमावे. तसेच अन्य मनुष्यबळ उपलब्ध करावे. मनुष्यबळाअभावी औषध खरेदी प्रक्रियेवर कुठलाही परिणाम होता कामा नये, असे निर्देशही त्यांनी दिले.

 

पुढील तीन महिन्यांत विभागाची बिंदूनामावली तयार करून समाजकल्याण विभागाकडून मंजूर करण्याची कार्यवाही करावी. बिंदू नामावली मंजूर झाल्यानंतर विभागातील पदोन्नती प्रक्रिया गतीने राबविता येणे शक्य आहे. राज्याच्या निर्मितीपासून 8 आरोग्याचे विभाग आहेत. यामध्ये लोकसंख्यावाढ, जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्येची घनता आदी बाबींचा विचार करून राज्यात 19 विभाग निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर करावा. हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करून क्षेत्रीय विभाग वाढविण्यात यावे. गट ‘क’ व ‘ड’ संवर्गाच्या भरती प्रक्रियेत पदनिहाय आलेल्या अर्जांचे प्रमाण दर्शविणारी माहिती देण्यात यावी. परीक्षा लवकरात लवकर घेवून मनुष्यबळ उपलब्ध करावे. ‘सुंदर माझा दवाखाना’ अभियान पुन्हा राबविण्यात यावे.

 

अभियानांतर्गत रुग्णालयांची आतील व बाहेरील संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी. ‘आयुष्मान भारत’ कार्डचे वितरण वाढले पाहिजे. आयुष्मान भव : मोहिमेदरम्यान 3 कोटी आभा कार्ड तयार करावेत. आरोग्य विभागाची स्वतंत्र बांधकाम आस्थापना निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करून मंत्रिमंडळासमोर आणावा. नुकत्याच राज्यात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विभागाने भरारी पथक तयार करून रूग्णालयांची तपासणी करावी. यामध्ये स्वच्छता, औषधीसाठा, खाटांची स्थिती, फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट आदींचा समावेश असावा.

 

बैठकीत रुग्णालयांच्या बांधकामाची सद्य:स्थिती माहिती, निवृत्तीनंतर 5 वर्षांसाठी सेवा घेणे, आयुष्मान भव: मोहीम, अवयवदान नोंदणी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार यांनी माहिती दिली. आयुष्मान भव: मोहिमेत अवयवदान नोंदणी व रक्तदान शिबिरांच्या आयोजनांमध्ये महाराष्ट्र राज्य देशात अव्वल असल्याची माहितीही आयुक्त श्री. कुमार यांनी दिली. बैठकीला आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post Views: 130
Previous Post

राज्यात हेलिपॅड उभारणीसाठी एमएडीसी नोडल एजन्सी, एअर ॲम्ब्युलन्सचा मार्गही सुकर

Next Post

हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल लोकसभेतून निलंबित

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल लोकसभेतून निलंबित

हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल लोकसभेतून निलंबित

ताज्या बातम्या

अवकाळीच्या दणक्याने पिकांचे मोठे नुकसान..!

अवकाळीच्या दणक्याने पिकांचे मोठे नुकसान..!

March 20, 2026
शिवाजी पॉलिटेक्निक मध्ये बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

शिवाजी पॉलिटेक्निक मध्ये बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

March 20, 2026
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूरात १५ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूरात १५ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन !

March 20, 2026
पैलवानाकडून पिस्टल व एक जिवंत राऊन्ड जप्त

पैलवानाकडून पिस्टल व एक जिवंत राऊन्ड जप्त

March 20, 2026
नव्या वर्षाचा नवा संकल्प: जलसाक्षरतेची गुढी! 

नव्या वर्षाचा नवा संकल्प: जलसाक्षरतेची गुढी! 

March 20, 2026
अकलूज परिसरात गारांसह अवकाळी पाऊस

अकलूज परिसरात गारांसह अवकाळी पाऊस

March 20, 2026
शंभू महादेवाच्या मनाच्या कावड्या सजल्या

शंभू महादेवाच्या मनाच्या कावड्या सजल्या

March 20, 2026
मधुरा सलवारू ताई – सोलापूरचा अभिमान, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रेरणास्थान!

मधुरा सलवारू ताई – सोलापूरचा अभिमान, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रेरणास्थान!

March 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0750721

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697