तरुणीने विवाहास नकार दिल्याच्या रागातून तिच्या दुचाकीसह इतर सहा ते सात वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित सुनीत पगारे आणि अन्य एकास ताब्यात घेतले आहे, सुनीत पगारे याने तरुणीशी ओळख वाढवून तिला लग्नाची मागणी घातली, मात्र तरुणीने नकार दिल्याने तरुणीचा भाऊ अपार्टमेंट च्या खाली बसलेला असताना त्याला मारहाण करण्यात आली, त्यानंतर मध्यरात्री अपार्टमेंट मध्ये येऊन तरुणीच्या दुचाकींची तसेच इतर 7 ते 8 वाहनांना ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली, यात वाहनांचे मोठे नुकसान झाले, रहिवाश्यांनी तातडीने पाणी टाकून आग विझवली, तरुणीच्या दुचाकीची यापूर्वी ही पगारे याने तोडफोड केली होती, काल तरुणीने भद्रकाली पोलिसात फिर्याद दिल्याने पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, ऐन सणासुदीच्या दिवसात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...