Friday, March 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंतप्रधानांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समज द्यावी – मनोज जरांगे पाटील

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 14, 2023
in maharashtra
0
पंतप्रधानांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समज द्यावी – मनोज जरांगे पाटील
0
SHARES
79
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजपने मराठ्यांना अंगावर घेऊ नये. याच मराठ्याने १०६ आमदार निवडून दिलेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता आणण्यात मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समज द्यावी, अशी विनंती मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेले मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अंतरवाली सराटी येथे जाहीर सभा झाली. विराट संख्येने उपस्थित असलेल्या मराठा बांधवांना त्यांनी संबोधित केले.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीत समावेश करावा, अशी मराठा समाजाची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे केवळ १० दिवस उरलेत. या १० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या. तसेच मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराच त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. मी मराठा समाजाच्या पुढे जात नाही. आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही. फक्त शांततेत आंदोलन करा. आरक्षण कसं मिळत नाही हे मराठा समाज बघून घेईल. जर २४ ऑक्टोबरच्या आत आरक्षण दिलं नाही तर मी टोकाचं उपोषण करेन. एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघेल. पुढची दिशा २२ ऑक्टोबर रोजी तुम्हाला सांगितली जाईल. मराठा समाजाने सज्ज व्हावे, असेही जरांगे पाटील म्हणाले.

आरक्षण न दिल्यास पुढची जबाबदारी सरकारची!

ते पुढे म्हणाले की, मराठा समाज एक होत नाही असं बोलणाऱ्यांना या गर्दीने उत्तर दिले आहे. कोण म्हणतो मराठा एक होत नाही. यांना ते समाजावून सांगा आरक्षण घ्यायला आला की कशाला आला आहात. आपल्या मराठा समाज्याची मूळ मागणी आरक्षण आहे. नेमकं कोण आहे, जे मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्याच्या मध्ये येत आहे? नेमक कोण आरक्षण देत नाही हे ऐकण्यासाठी कानाकोपऱ्यातून लोक आले आहेत. सरकारला विनंती आहे की, तुमच्या हातात ४० दिवसांपैकी १० दिवस हातात उरलेले आहेत. आज जो जनसागर उसळला आहे त्यांची ही मागणी आहे की, राहिलेल्या १० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्यावे. जर दिलं नाही तर पुढची जबाबदारी सरकारची असेल.

पाच हजार पानांचा पुरावा मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी पुरेसा!

मी सरकारला जाहीरपणे विनंती करतो की, मराठा समाजासाठी गठीत केलेल्या समितीचे काम बंद करा. पाच हजार पानांचा पुरावा मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी पुरेसा आहे. तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाहीत हेही यावेळी त्यांनी सांगितले.

काय आहेत जरांगे पाटलांच्या मागण्या

महाराष्ट्रातील समस्त मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजासाठी बलिदान देणाऱ्या ४५ बांधवांना सांगितलेला निधी व सरकारी नोकरी द्यावी, दर १० वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवाचा सर्व्हे करावा आणि प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात, सारथी संस्थेमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देवून त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावावेत, मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण दिलं तरीही चालेल पण टिकणारं आरक्षण हवं आहे.

Post Views: 151
Previous Post

जरांगेंनी सदावर्तेंना सुनावल्यानंतर गुणरत्न सदावर्ते

Next Post

बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे 50 ठिकाणी छापे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे 50 ठिकाणी छापे

बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे 50 ठिकाणी छापे

ताज्या बातम्या

चिमण्यांच्या संवर्धनासाठी वर्षभरात शेकडो कृत्रिम घरटे बनवून मोफत वाटप

चिमण्यांच्या संवर्धनासाठी वर्षभरात शेकडो कृत्रिम घरटे बनवून मोफत वाटप

March 20, 2026
अधिकृत एस . टी . बस स्थानकासमोरच बसेस थांबणार

अधिकृत एस . टी . बस स्थानकासमोरच बसेस थांबणार

March 20, 2026
नई जिंदगी भागात अमिना बजारचे उद्घाटन

नई जिंदगी भागात अमिना बजारचे उद्घाटन

March 20, 2026
शहरात उभारली गॅस सिलेंडरची अनोखी गुढी; WOW महिला संघटनेचा निषेध

शहरात उभारली गॅस सिलेंडरची अनोखी गुढी; WOW महिला संघटनेचा निषेध

March 20, 2026
विठ्ठल मंदिरात गुढीपाडव्या निमित्त ध्वजपूजन

विठ्ठल मंदिरात गुढीपाडव्या निमित्त ध्वजपूजन

March 20, 2026
पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पदे पदोन्नतीने भरा

पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पदे पदोन्नतीने भरा

March 20, 2026
एनबीकेबीवायएफच्या चाहत्यांनी केला चिल सेंटरचा शुभारंभ

एनबीकेबीवायएफच्या चाहत्यांनी केला चिल सेंटरचा शुभारंभ

March 20, 2026
नूतन वर्षाचे स्वागत म्हणून प्रत्येक नागरिकाने किमान १ कडुलिंबाचे झाड लावूया

नूतन वर्षाचे स्वागत म्हणून प्रत्येक नागरिकाने किमान १ कडुलिंबाचे झाड लावूया

March 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0750887

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697