दिनांक – 2.6.2023 रोजी धाराशिव जिल्ह्यातील परांडा पो. स्टे. च्या हद्दीत परांडा- कुर्डूवाडी रोडवर असणार्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा टाकुन पोलिस अधीक्षक सरांच्या टीमने 3 इसमांना ताब्यात घेतले…घटना अशी की गेली सलग 2-3 त्याठिकाणी कत्तल होत असल्याची माहिती मिळत होती पण स्थानिक पोलिस प्रशासन वेळोवेळी माहिती देऊन देखील कोणतीही कारवाई करत नव्हते…सदरची माहिती ही पोलिस अधीक्षक सरांना कळविल्यानंतर सरांनी एक टीम तयार करून माझ्याशी संपर्क करून दिला. प्रत्यक अपडेट टीम ला मी पोहचवत होतो. त्यानंतर सायंकाळी 7 च्या दरम्यान सदर ठिकाणी छापा टाकला व 20 जणांपैकी 3 जणांना पकडण्यात यश आले… छापा टाकलेवेळी त्याठिकाणी 100 हून अधिक वासरांची मुंडकी धडावेगळी केलेली मिळून आली…शेजारीच चामड्या चा व पायांच्या खुरांचा ढीग आढळून आला…पोलिस अधीक्षक साहेबांच्या टीमने ताब्यात घेतलेल्या 3 इसमांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला व मिळून आलेले लहान लहान वासराचे मांस न्यायालयाच्या आदेशाने डिस्पोज केले..!
पण इथ महत्त्वाचं म्हणजे ज्या गायीच्या दुधावर शेतकरी आपली उपजीविका चालवतात त्याच गायीच्या गर्भातून जन्म घेणार्या वासराला कसायाच्या सुर्याखाली कसे कापायला देत असतील…ह्या अश्या शेतकर्यांची मानसिकता फक्त एवढीच की हे सगळ ह्यांच्या डोळ्यापुढ घडत नाही पण त्याठिकाणी छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांनादेखील त्या ठिकाणचे दृश्य पाहून अश्रू अनावर झाले…म्हणजे स्वतः ला बळीराजा म्हणवनारा शेतकरी इतका दगडाच्या काळजाचा कसा असू शकतो असा प्रश्न मला पडला आहे… आणि जो पर्यंत ह्या पवित्र भुमित गोवंशाचे रक्त सांडत राहील तो पर्यंत त्यांच्या कत्तलीला जबाबदार असणारा शेतकरी कधीच सुखी होऊ शकत नाही..!
विशेष सहकार्य केलेले धाराशिव चे पोलिस अधीक्षक श्री. अतुलजी कुलकर्णी सर व त्यांच्या सर्व टीम चे मनःपूर्वक