तालुक्यातील डिग्रस, शेखराजूर, पारवा रस्त्याचे काम (एम.डी.आर-16) अंतर्गत सुरु असून सदरील गुत्तेदार काम करीत असतांना थातुरमातूर गिट्टी वापरुन कमी दर्जाचे मटेरीअल पावरत असल्याने काम नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार पारवा येथील ग्रामस्थांनी जिल्हा अधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. गत पंचवीस वर्षांपासून या रस्त्याची चाळणी झाली होती. अनेक वेळी याच खड्यात थातूर मातूर गिटी, मूरूम टाकून खड्डे बूजविले जात होते. खड्यामूळे या रस्त्यावरून ये-जा करणार्या वाहान धारकांना तसेच नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशातच या रस्त्याचे काम बांधकाम विभागाने सूरु केले आहे. सदरील कामासाठी पाणी, रोलर आदी न फिरवताच कोरडी खडी अंथरुन काम सुरू आहे.
या कामी अनियमतता असल्याने काम बोगस होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. याच कामात माती मिश्रीत मूरुम असल्याने काम व्यवस्थित होत नाही. त्यामुळे जैसे थे परिस्थीती निर्माण होण्याची भिती येथी ग्रामस्थांना आहे. त्यामुळे सदरील कामाची चौकशी करुन काम दर्जेदार करावे असे निवेदन जिल्हा अधिकारी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे या निवेदनावर मधुकरराव कराळे, गोविंद हरिभाऊ , विजय कराळे, बाळाजी कराळे , गोविंद वाके, पुरभाजी मोहिते , माधव कराळे ,आदिनाथ कराळे, संभाजी कराळे, देविदास कराळे ,ज्ञानोबा कराळे ,विष्णू कराळे , यांनी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
डिग्रस,शेखराजूर, पारवा रस्त्याच्या या कामासाठी अधिकारी फिरकले नाहीत. त्यामुळे गुत्तेदार आपली मनमानी करुन काम नित्कृष्ट दर्जाचे काम करत आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा निधी पाण्यात जात आहे. एजन्सीच्या नावाखालीअधिकारीच काम करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्या वरिष्ठनी या कामासाठी लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे