सत्तर वर्षापासून सोलापुरी चटण्या, मसाले, लोणची यांची उत्पादने यासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर येथील पेठे फूड्स यांच्या १० व्या शॉपीचे उद्घाटन सांगली येथे संपन्न झाले. विश्रामबाग स्वा.सावरकर कॉलनी येथील वेदा फूड्स येथे ही शॉपी सुरु करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सांगली अर्बन को ऑप बँकेचे अध्यक्ष गणेशराव गाडगीळ होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पेठे फूड्सचे संचालक दिलीप पेठे, संचालिका सौ.सुवर्णा पेठे तसेच संचालक चैतन्य पेठे हे होते.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत सत्कार वेदा फूड्सच्या तर्फे करण्यात आला. पेठे फूड्सचे तर्फे श्री.गणेशराव गाडगीळ यांचा सत्कार दिलीप पेठे यांनी केला. त्यानंतर फीत कापून उद्घाटन झाले. प्रास्ताविक श्री.एकबोटे यांनी केले.पेठे फूड्सच्या संचालिका सौ.सुवर्णा पेठे यांनी यावेळी पेठे फूड्सच्या विविध उत्पादने यांची माहिती दिली. चव आणि दर्जामुळे महाराष्ट्रात आमच्या उत्पादनांना मोठी मागणी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेशराव गाडगीळ यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले पेठे यांच्या मसाले,लोणची तसेच विविध प्रकारच्या चटण्या यांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
त्यामुळे चांगल्या दर्जाच्या पेठे यांच्या उत्पादनांना नेहमीच मोठी बाजारपेठ उपलब्ध होते तसेच दर्जा व कायमस्वरूपी तीच असणारी चव आणि गुणवत्ता पूर्ण उत्पादन या मुळे पेठे फूड्स हा सर्व ग्राहकांच्या हृदयात स्थान वसलेला ब्रँड आहे. आभार प्रदर्शन कु.वेदश्री एकबोटे यांनी केले. या कार्यक्रमास बी.जी चितळे उद्योग समूहाचे संचालक विश्वास चितळे, सांगली अर्बन बँकचे उपाध्यक्ष सी.ए श्रीपाद खिरे, संचालक शैलेंद्र तेलंग, मनोज कोरडे, सौ.स्वाती करंदीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, सरव्यवस्थापक वासुदेव दिवेकर, मुकुंद करंदीकर आदि मान्यवर व नागरिक उपस्थित होते.