भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने कमाल केली राव…पहिले अंतिम फेरीत धडाक्यात एन्ट्री मारली आणि आता चार वेळचा चॅम्पियन दक्षिण कोरियाला हरवत ज्युनियर आशिया चषक भारतीय संघाच्या नावावर केलं. ज्युनियर हॉकी संघाच्या पोरींना इतिहास रचला आहे. भारतीय संघाने पहिल्यांदाच ज्युनियर आशिया चषक जिंकल आहे. पोरींच्या या सोनेरी यशाचं कौतुक अख्खा भारत करत आहेत.
गेल्या वर्षांनंतर ही स्पर्धा खेळल्या गेली. 2021 मध्ये ही स्पर्धा होणार होती पण कोरोनामुळे ती झाली नाही. दक्षिण कोरियाने या स्पर्धेवरील वचर्स्व पाहता पोरींची ही किमया भारतीयांचासाठी अभिमानाची बाब आहे. रोमंचक आणि थरार अशा खेळात एक एक अशी बरोबरी असताना कोण जिंकणार याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. जपानमध्ये झालेल्या या स्पर्धेत अखेरचा क्षणी भारतीय संघातील खेळाडूंने गोल करुन भारतीय संघाला विजय मिळवून दिला.