बिग बॉस १६ मधून अर्चना गौतम घराघरात पोहोचली, मात्र सध्या घडलेल्या प्रकारामुळे तिच्यावर तोंड लपवण्याची वेळ आली आहे…
बिग बॉस आणि खतरों के खिलाडी १३ मधून घराघरात पोहोचलेली अर्चना गौतम सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या ती ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये दिसत असली तरी, एका व्हिडिओमुळे ती विशेष चर्चेत आहे. काँग्रेसच्या दिल्ली कार्यालयाबाहेर ती आणि तिच्या वडिलांसोबत जो प्रकार घडला, हा अर्चना, तिचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्यासाठी मोठा धक्का होता. आता या दरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. ज्या पक्षासाठी अभिनेत्री काम करत होती, त्या पक्षातून जून महिन्यातच तिला हद्दपार करण्यात आले आहे.
काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रवक्ते अंशू अवस्थी यांनी सांगितले की, अर्चना गौतमची यावर्षीच जूनमध्ये काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. ते असे म्हणालेली की, अर्चनाला गैरवर्तणुकीच्या आरोपावरून पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मेरठच्या काँग्रेस युनिटकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे पक्षाने हा निर्णय घेतला आहे. न्यूज १८ शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
अंशू पुढे म्हणालेले की अर्चनाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पक्षाने तिच्यावर विश्वास ठेवलेला. ते म्हणाले की, ‘पक्षाने त्यांच्यावर वर विश्वास ठेवला. त्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीही देण्यात आली. पण मेरठ युनिटमध्ये, २०२२ च्या निवडणुकीत त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या गैरवर्तनाच्या सतत तक्रारी येत होत्या. त्यामुळे पक्षाच्या शिस्तपालन समितीने अर्चना गौतम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.’
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काँग्रेस पक्षाच्या एका पत्रात अर्चनाला सहा वर्षांसाठी बाहेर काढण्यात आल्याचे म्हटले आहे. अवस्थी म्हणाले की, गौतमला बाहेर काढण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती आणि उत्तर देण्यासाठी एका आठवड्याची मुदतही देण्यात आलेली. नोटीसमध्ये म्हटले आहे की, मेरठ युनिटच्या पक्ष कार्यकर्त्यांकडून त्यांच्या विरोधात लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. तक्रारी अशा होत्या की त्यांनी पक्ष निधी मिळत असूनही त्यांनी प्रचारासाठी घेतलेल्या अनेक वाहन मालकांची थकबाकी भरली नाही.
वारंवार प्रयत्न करूनही कार मालकांना पैसे न मिळाल्याने त्यांनी कार्यकर्त्यांकडे तक्रार केली. नोटीसमध्ये असेही नमूद करण्या आले आहे की, प्रचारादरम्यान आलेल्या सामानाचा गैरवापर करून ते नंतर विकल्याचाही आरोप तिच्यावर आहे. दरम्यान पक्षाच्या एका सूत्राने सांगितले की, ‘अर्चना यांनी नोटीसला प्रतिसाद दिला नाही. या तक्रारी प्रियांका गांधींपर्यंत पोहोचल्यानंतर अर्चना गौतम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.’