विश्वचषक २०२३ च्य मोहिमेला भारत आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून सुरुवात करत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील हा समान चेन्नईमध्ये खेळवला जात आहे. य सामन्याचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या.
बहुप्रतीक्षित असा आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ भारतात सुरु झाला आहे. यासोबतच आज करोडो भारतीयांची प्रतीक्षा संपली असून भारतीय संघ २०२३ विश्वचषकाच्या मोहिमेला सुरुवात करत आहे. भारताचा पहिला सामना पहिला सामना बलाढ्य प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे. या सामन्याने केवळ भारतच नाही तर ऑस्ट्रेलियाही आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. अर्थात, २०२३ च्या विश्वचषकात दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असेल.
> भारताच्या खात्यात पहिले यश
सामन्याच्या दुसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करत पहिली विकेट मिळवली. बुमराहच्या गोलंदाजीवर मिचेल मार्श खातेही न उघडता विराट कोहलीकडून बाद झाला.
रोहित शर्मा (क), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
> ऑस्ट्रेलिया संघ
डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी(यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स(कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा
> शुभमन गिलच्या जागी इशान किशन
दुर्दैवाने शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. आज सकाळपर्यंत गिल ठीक होण्याची संघाने वाट पाहिली पण त्याला खेळणे आज शक्य नसल्याचे कळले. त्यामुळे इशान किशन त्याच्या जागी सलामी देणार आहे, असे भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले.
> सामन्याची नाणेफेक
आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्याची नाणेफेक झाली असून ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे.
> गिल संघाच्या बसमध्ये नाही
शुभमन गिलच्या खेळण्याबद्दल शंका होती आणि ताजी अपडेट अशी आहे की तो टीम बसमध्ये दिसला नाही, ज्यामुळे तो पहिला सामना खेळणार नाही असे दिसते.
> इशान किशन की शुभमन गिल
भारताचा धाकड सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली असून तो आजच्या सामन्यात खेळणार नसल्याचे म्हटले जात आहे. जर शुभमन आजच्या सामन्यात खेळला नाही तर इशान किशन सलामीला उतरण्याचे संकेत आहेत.
> चेन्नईचे मैदान आणि एकदिवसीय विश्वचषक
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आतापर्यंत ७ विश्वचषक सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी ऑस्ट्रेलियाने ३ सामने खेळले आहेत आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ते सर्व जिंकले आहेत.