शनिवारी अहमदाबादमध्ये होणार्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे भारतीयांसह जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या सामन्यासाठी रोहित शर्माबरोबर हार्दिक पांड्या सहकर्णधार असणार आहे.
भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की, क्रिकेट चाहत्यांमध्ये हायटेन्शन असते. तसेच दोन्ही संघांवरही जिंकण्याचे तितकंच दडपण असते. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघ प्रत्येकी दोन सामने जिंकलेत. त्यामुळे विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मावर जास्त दबाव असणार आहे, कारण विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध पहिल्या पराभवाचा ठपका पडू नये, यासाठी रोहित शर्मा प्रयत्नशील असणार आहे. यासाठीच दोन कर्णधार ठेवण्यात आले आहे.