”मराठा आरक्षण” हा समाजाच्या अस्मितेचा मुद्दा आहे. शासन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहत नसेल तर समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी लढत राहावे, परंतु कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये.
या समाजाच्या लढ्यासोबत शेतकरी कामगार पक्ष सोबत राहील अशी ग्वाही शेकापचे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली.जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला. मनोज जरांगे यांच्याशी डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी चर्चा करून तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांस मार्गदर्शनही केले.