भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत याचे आज (२४ फेब्रुवारी २०२३) निधन झाले. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. देवीसिंह शेखावत यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांना पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज सकाळी ९.३० वाजता उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६ वाजता पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
देवीसिंह शेखावत हे अमरावतीचे प्रथम महापौर होते. विद्याभारती शिक्षण संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी १९६५ मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याशी लग्न केले. मागील अनेक वर्षापासून ते पुण्यात वास्तव्यास होते.