दि.12 आॕ. 2023 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मेहता शाळेत मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत पंचप्रण प्रतिज्ञा घेण्यात आली. या उपक्रमासाठी शाळेचा माजी विद्यार्थी चि. जयंत भालेराव यांनी विद्यार्थ्यांकडून स्मरणशक्ती व बौद्धिक कौशल्य वाढविण्यासाठी प्राणायाम आणि सूक्ष्म व्यायाम उत्कृष्टरित्या करून घेतले.
शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. श्रुती बागेवाडी, पर्यवेक्षिका मा. सौ. सुस्मिता तडकासे, शिक्षक- शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापिकांसह सर्व शिक्षक वृंदांनी हातात मातीचे दिवे घेऊन विद्यार्थ्यांसमवेत पंचप्रण प्रतिज्ञा घेतली.