मदनदासजींचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा.
प्रखर बुद्धिमत्तेचे उच्च विद्याविभूषित असलेले (MCom, LLB, CA) मदनदासजी १९६९ पासून आजपर्यंत आजन्म संघ प्रचारक राहिले. दैनंदिन कार्यनिवृत्तीपूर्वी ९ वर्षे संघाचे अ.भा. सहसरकार्यवाह होते.
अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री म्हणून अभाविपच्या देशभरातील उभारणीत त्यांचा फार मोठा सहभाग राहिला.
सुरुवातीला संघ प्रचारक नंतर दीर्घकाळ अन्य क्षेत्र (त्या काळात परिवार संस्था म्हणत) आणि नंतर पुन्हा संघ दायित्व असा कार्यप्रवास करणारे अनेक प्रचारक होऊन गेले. मदनजी त्यातील एक प्रमुख नाव !
असू आम्ही सुखाने पत्थर पायातील |
मंदिर उभविणे हेच आमुचे शील ||
हे संघगीत जगलेला देवदुर्लभ कार्यकर्ता !!
|| ओम शांती ||
🙏🙏🙏🙏🙏