Friday, March 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वाशिम : अखेर खरीप हंगामातील प्रतिकुल परिस्थितीअंतर्गत पिक विमा मंजूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 11, 2023
in maharashtra
0
वाशिम : अखेर खरीप हंगामातील प्रतिकुल परिस्थितीअंतर्गत पिक विमा मंजूर
0
SHARES
59
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2023-24 च्या अंमलबजावणीसाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नेमणूक वाशिम जिल्हयासाठी करण्यात आली आहे.पावसातील खंड व दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर हंगामातील प्रतिकुल परिस्थिती या बाबीअंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या प्रमाणात 25 टक्के अगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे.

 

त्याअनुषंगाने माहे, ऑगस्ट 2023 या महिन्यातील 3 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीमध्ये जिल्हयातील 46 महसुल मंडळामध्ये वरील कालावधीत सरासरी पावसाच्या 50 टक्केपेक्षा कमी पाऊस पडला. 31 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय समितीची या अनुषंगाने बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या बैठकीमध्ये जिल्हयातील 46 महसूल मंडळाकरीता हंगामातील प्रतिकुल परिस्थीती या बाबीअंतर्गत सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम देण्याबाबत विमा कंपनीस सूचना देण्यात आल्या होत्या. परंतू विमा कंपनीने विभागीय व राज्यस्तरावर अपिल केली होती. दोन्ही ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी दिलेला आदेश ग्राहय धरुन कंपनीने केलेली अपिल फेटाळण्यात आले. तरी सुध्दा वाशिम जिल्हा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात हंगामातील प्रतिकुल परिस्थीतीअंतर्गत पिक विमा मंजूर करण्यात आला होता.त्यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांचा व लोकप्रतिनिधींचा कंपनीविरोधात रोष निर्माण झाला.

 

जिल्हयातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नाने कंपनीने 25 टक्के रक्कम अग्रीम मंजूर केली आहे. याचा लाभ जिल्हयातील 2 लक्ष 70 हजार 993 सोयाबीन उत्पादक विमाधारक शेतकऱ्यांना होणार आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी विम्याची रक्कम जमा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी भारतीय कृषी विमा कंपनीला केली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा यांनी दिली.

Post Views: 143
Previous Post

नमुंमपामार्फत ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानांतर्गत किल्ले स्पर्धा आयोजन

Next Post

रब्बीच्या सोलापूर जिल्ह्यात ५१ टक्केच पेरणी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
रब्बीच्या सोलापूर जिल्ह्यात ५१ टक्केच पेरणी

रब्बीच्या सोलापूर जिल्ह्यात ५१ टक्केच पेरणी

ताज्या बातम्या

अवकाळीच्या दणक्याने पिकांचे मोठे नुकसान..!

अवकाळीच्या दणक्याने पिकांचे मोठे नुकसान..!

March 20, 2026
शिवाजी पॉलिटेक्निक मध्ये बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

शिवाजी पॉलिटेक्निक मध्ये बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न

March 20, 2026
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूरात १५ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूरात १५ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन !

March 20, 2026
पैलवानाकडून पिस्टल व एक जिवंत राऊन्ड जप्त

पैलवानाकडून पिस्टल व एक जिवंत राऊन्ड जप्त

March 20, 2026
नव्या वर्षाचा नवा संकल्प: जलसाक्षरतेची गुढी! 

नव्या वर्षाचा नवा संकल्प: जलसाक्षरतेची गुढी! 

March 20, 2026
अकलूज परिसरात गारांसह अवकाळी पाऊस

अकलूज परिसरात गारांसह अवकाळी पाऊस

March 20, 2026
शंभू महादेवाच्या मनाच्या कावड्या सजल्या

शंभू महादेवाच्या मनाच्या कावड्या सजल्या

March 20, 2026
मधुरा सलवारू ताई – सोलापूरचा अभिमान, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रेरणास्थान!

मधुरा सलवारू ताई – सोलापूरचा अभिमान, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रेरणास्थान!

March 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0750808

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697