सिल्लोड तालुक्यातील शिवना धोत्रा मार्गावरील इदगाह जवळील एका हॉटेलात गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास अजिंठा पोलिसांनी धाड टाकून 5 जुगाऱ्याना झना मन्ना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले असून दोघे मात्र फरार झाले आहेत.या धाडीत एक कार,3 मोटारसायकल,4 मोबाईल,24960 नगद रोकड सह जुगाराचे साहित्य असा एकूण 22 लाख 31 हजार 960 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून 7 आरोपीन विरुध्द अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे पत्याचे डाव मोठ्या प्रमाणात रंगत असल्याची मिळालेल्या गुप्त माहिती वरून अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू राठोड,गणेश काळे, पोहिकॉ अक्रम पठाण,वाहन चालक संजय कोळी,3 होमगार्ड आदीच्या पथकाने शिवना धोत्रा मार्गावरील इदगाह जवळील एका हॉटेलात गुरुवारी रात्री टाकलेल्या धाडीत 5 आरोपींना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले असून 2 आरोपी मात्र फरार झाले आहेत.या धाडीत एक कार,3 मोटारसायकल,4 मोबाईल,24960 नगद रोकड सह जुगाराचे साहित्य असा एकूण 22 लाख 31 हजार 960 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून 7 आरोपीन विरुध्द अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका दिलीप तडवी करीत आहे.