आमदार राजेंद्र राऊत व कुटुंबियातर्फे बार्शीचे ग्रामदैवत भगवंत मस्तकी एक किलो शंभर ग्रॅम सोन्याचा मुकूट अर्पण केला.अतिशय सुंदर व कलाकुसर असलेला हा मुकुट कोल्हापूर येथील कारागिराने तयार केला आहे. मुकूट अर्पण सोहळ्यानिमित्त ह.भ.प.जयवंत बोधले महाराज यांचे कीर्तन पार पडले.प्रसंगी विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय उपस्थित होते.मुकुट अर्पण सोहळ्यानंतर आमदार राजाभाऊ राऊत व कुटुंबियातर्फे महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला संपूर्ण राऊत कुटुंब,बार्शी शहर व तालुक्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर तसेच भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...























