पाच ते सहा नराधमांनी दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक व संतापजनक घटना शुक्रवारी रात्री घडली. पाच ते सहा नराधमांनी दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक व संतापजनक घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.शहरातील न्यू तापडिया नगर भागात शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास १४ व १६ वर्षीय दोन मुलींवर पाच ते सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला. या नराधमांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची माहिती आहे. या अमानुष प्रकारामुळे शहर चांगलेच हादरले. पीडित मुलींनी घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगताच त्यांना धक्का बसला. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी मुलींच्या पालकांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस पथक संशयाच्या आधारे आरोपींचा शोध घेत असून काहींना ताब्यात घेतल्याचे समजते.गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाल्याचे चित्र आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...