सोलापूर महापालिकेने गणेशोत्सवामुळे थांबविलेली मिळकत कर वसुली मोहीम सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात तीन लाख व त्यापेक्षा अधिक मिळकत कर थकबाकी असलेल्या साधारण पावणे दोनशे कोटीच्या थकबाकीपोटी १ हजार १५० मिळकतदारांना नोटीस काढण्यात आले आहेत. पेठनिहाय नोटीस वाटपाला सुरवात झाली आहे.
महापालिका प्रशासनाने पाच व सहा टक्के सूट घेऊन मिळकत कर भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. या कालावधीत १०२ रुपयांची वसुली झाली. यापूर्वी थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविली जात होती.परंतु या योजनेमुळे प्रामाणिक कर भरणाऱ्यांवर अन्याय होत असल्याने आयुक्तांनी ही अभय योजना पूर्णतः बंद केली. त्यामुळे मुदतीनंतर सव्वा महिन्यात साधारण दहा कोटी रुपये असे एकूण १११ कोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले.