पैशांच्या व्यवहारातून शिवीगाळ, मारहाण करून धमकी दिल्यावरून दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. हिरामोती टॉवरसमोर ही घटना घडल्याची तक्रार जगन्नाथ सुदर्शन आडम यांनी दिली आहे.
यातील फिर्यादी जगन्नाथ आडम व पोलिस राजकुमार वाघमारे, महेंद्र राजू गोगरे (रा. गोंधळे वस्ती, सोलापूर) यांच्यामध्ये हिरामोती टॉवरसमोर पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला. यात राजकुमार वाघमारे व महेंद्र गोरे यांनी फिर्यादीला शिवीगाळ, मारहाण करून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.