मराठा आरक्षणासाठीचा संघर्ष आजही सुरूच असून, उत्तर तालुक्यातील कोंडी येथे ‘मराठा आरक्षण नाही तर दिवाळीही नाही’ असे फलक लागले आहेत. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तब्बल ४० दिवस वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करणाऱ्यांठी एकत्र आलेल्या कोंडीकरांनी दिवाळीच न करण्याचा निर्णय घेतला आहे. गावात कोणी फटाके वाढविणार नाही व कोणी दिवाळीचे पदार्थही करणार नसल्याचे सांगण्यात आले.
मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोंडीत तब्बल ४० दिवस साखळी उपोषण केले. त्यातच संभाजी ब्रिगेडच्या सोमनाथ राऊत व प्रकाश भोसले यांनी आठवडाभर अन्नत्याग आंदोलन केले. मुंडण आंदोलन, चूलबंद आंदोलन, गावबंद आंदोलन, महिला व पुरुष भजन अशी वेगवेगळी आंदोलने कोंडीत करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात मनोज जरांगे-पाटील आले होते त्यावेळी कोंडीत ते साखळी उपोषणाच्या ठिकाणी आले होते. कोंडीच्या गावकऱ्यांनी जरांगे-पाटील यांचे स्वागत केले होते. आता गावकराऱ्यांनी एकत्र येत दिवाळी न करण्याचा निर्णय घेतला आहे.